बाबुर्डी घुमट येथे १५ वर्ष सत्ता गाजवणाऱ्या नम्रता पॅनला धोबीपछाड

0
85

सरपंचपदी नमिता पंचमुख तर उपसरपंचपदी तानाजी परभाणे यांची एक मताने निवड

नगर प्रतिनिधी – नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलने दणदणीत विजयी संपादित करत नम्रता पॅनलच्या पंधरा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. आज बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नमिता पंचमुख व उपसरपंचपदी तानाजी परभाणे यांची एकमताने निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली साळवे यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी सदस्य पवन लांडगे, ज्योती परभाणे, वंदना चव्हाण, शहाबाई मुंजाळ यांच्यासह परिवर्तन पॅनलचे प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच नमिता पंचमुख म्हणाल्या की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतचा कारभार केले जाईल, ग्रामपंचायत ही गावकऱ्यांची कामधेनू आहे. गावातील महिलांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष काम करून असे ते म्हणाल्या.

उपसरपंच तानाजी परभाणे म्हणाले की, बाबुर्डी घुमट ग्रामस्थांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला विकास कामातून पात्र ठरवू, गावच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here