बाराबाभळी,शहापुर केकती, भागात मेहेकरी सब स्टेशन कट करून भिंगार रुरलचे लाइंट कनेक्शन द्यावे दलित महासंघाचे निवेदन

0
48

अन्यथा 15 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा

अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर

बाराबाभळी, शहापुर, केकती ग्रामीण भागात लाईटीची मोठया प्रमाणात समस्या झालेलली असुन या ठिकाणी रहाणारे नागरिक मोठया प्रमाणात लाईटीच्या समस्येमुळे त्रस्त झालेले असुन या ठिकाणी रहाणारे सर्व नागरीक वेळेवर लाईट बिल भरत असतात. कोणत्याही प्रकारे थकबाकी ठेवित नाहीत.परंतु येथील नागरीकांच्या समस्येला कोणत्याही प्रकारे अधिकारी वाव देत नसुन ग्रामीण भाग असल्यामुळे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच यापूर्वी या ठिकाणी नागरीकांनी सुमारे ४ ते ५ वेळेस अर्ज सादर केलेले आहे.परंतु कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही.

  बाराबाभळी,शहापुर केकती, भागात मेहेकरी सब स्टेशन कट करून भिंगार रुरलचे लाइंट कनेक्शन द्यावे.याबाबतचे निवेदन दलित महासंघाचे युवक अध्यक्ष सुरेंद्र सिंग घारु यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चे कार्यकारी अभियंता यांना दिले.

लाईट नसल्याने रात्री त्या वेळी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात चो-या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.व या अंधारामुळे मोकाट कुत्र्यापासून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्यांची शक्यता नाकारता येत नाही.तसेच सद्य स्थितीत मुलांचे शिक्षणावर सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून या अंधारामुळे मुले-मुली कोणत्याही प्रकारे रात्रीचा अभ्यास करु शकत नाही.तसेच सद्य स्थितीत सदरचे कनेक्शन हे मेहेकरी सब स्टेशनची असुन सदरील कनेक्शनचे मोठया प्रमाणात अडचणी येत असुन ती लाईन कट करून रुरल भिंगार सबस्टेशनमधुन देण्यात यावी. जेणे करून लोकांच्या समस्या दूर होतील.

तरी मे.साहेबांना नम्र विनंती आहे.की वरिल विषयी योग्य ती दक्षता घेऊन वरिल ठिकाणी ग्रामीण भागात लाईटची समस्या दुर करण्यात यावी.ही नम्र विनंती.अन्यथा दलित महासंघाच्या वतीने येत्या १५ दिवसात आमरण उपोषण करण्यांत येईल व या उपोषणास होणा-या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासनावरच राहील याची दक्षता घ्यावी.असे दलित महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या निवेदनावर दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे,युवक अध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू,भिंगार अध्यक्ष प्रवीणकुमार जाधव,सामाजिक कार्यकर्ते सूरज उमाप आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here