बाहेरच्या सत्तापेंढाऱ्यांना यापुढे शहरात व जिल्ह्यात वाव नाही

- Advertisement -

बाहेरच्या सत्तापेंढाऱ्यांना यापुढे शहरात व जिल्ह्यात वाव नाही

लोकभज्ञाक चळवळीचा इशारा

बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करताना आपली राजकीय दिवाळखोरी दिल्लीगेट वेशीला लटकविल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जनतेबद्दल ज्यांना भक्ती नाही, ज्यांनी नगरच्या जनतेचे प्रश्‍न समजून घेतले नाही व हे प्रश्‍न सोडविण्याचे ज्यांच्याकडे काहीएक तंत्र नाही, त्याशिवाय ज्यांनी जनतेसाठी निष्काम कर्म केले नाही, असे लोक पुन्हा एकदा बाहेरच्या व्यक्तीला निवडणूकीसाठी निमंत्रित करुन शरणागती पत्कारत आहे. ज्यांना सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे राहून देखील शहराचे खड्डे संपवता आले नाही. सार्वजनिक बागा बालकांसाठी खुल्या करता आल्या नाहीत, जनतेचे प्रश्‍न सोडविता आले नाही. बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करताना आपली राजकीय दिवाळखोरी दिल्लीगेट वेशीला जाहिररित्या लटकविल्याचे स्पष्ट उदाहरण असल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या विकासासाठी आंतरिक तळमळी अभावी असे अनेक लोक सैरभैर झाले आहेत. लोकभज्ञाक चळवळीने अशा लोकांच्या विरूद्ध डिच्चू फत्ते जारी केला आहे. सार्वजनिक निवडणूका या सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळविण्याचे अड्डे झाले आहेत, परंतू स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळवू पाहणाऱ्या सत्तापेंढाऱ्यांना घरचा रस्ता लोकांनी दाखवला ही बाब नुकतीच संपूर्ण महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत सिद्ध केली आहे. ज्या कारणासाठी स्वातंत्र्य मिळविले ते लक्षात न घेता एकाधिकारशाही व घराणेशाही यापुढे चालणार नाही, ही बाब देखील जनतेने सुर्य प्रकाशाइतकी सिद्ध केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी जात आणि पैशाचा वापर करायचा आणि सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा मिळविण्याचे सुत्र वापरायचे ही बाब आता जनतेला मान्य नाही. काळ्या पैश्‍यातून गुन्हेगारांच्या टोळ्या सांभाळायच्या आणि संसदीय लोकशाहीचा खुन करायचा ही बाब देखील जनतेने नाकारली आहे. येत्या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्वांनाच मतदार घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा लोकभज्ञाक चळवळीने दिला आहे.

यापुढे पैसे देऊन मतं खरेदी करणाऱ्याला मतदार देशद्रोही ठरविल्याशिवाय राहणार नाहीत. जातमंडूक आणि धर्मवेड्या लोकांना जनतेने सक्तीने निवृत्त केले आहे. त्यामुळे यापुढे लोकांची भक्ति, लोकांच्या प्रश्‍नांचे ज्ञान आणि लोकांसाठी निष्काम कर्मयोग सिद्ध केल्याशिवाय कोणीही सार्वजनिक निवडणूकीसाठी उभे राहण्याचे धाडस करू नये. लोकशाही तत्वप्रणाली म्हणजे वेड्याबाबळीची शेती नाही. निवडून आल्यानंतर टक्केवारीची पाकीटं पाच वर्ष गोळा करण्याचे दिवस आता संपले आहेत, यापुढे लोकभज्ञाक आणि निसर्गभज्ञाक तंत्र ज्यांनी लोकांसाठी प्रत्यक्षात वापरले त्यांना लोकप्रतिनिधी होता येणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करून स्वतःची सोय पाहणाऱ्या लोकांनी जाहीररितीने शरणागती स्वीकरली आहे, असे जनतेला स्पष्ट रितीने कळाले आहे. अनेक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून लोकशाहीचा बट्ट्याबोळ करू पाहत आहेत. परंतू यापुढे त्यांना यश येणार नाही. पेट्या, खोके हे जनतेने मोडीत काढले आहे. रामाच्या नावावर रामभरोसे काम करणारे अयोध्येत देखील हरले आहेत. लोकशाही यापुढे भांडवली धंदा राहीला नाही आणि बाहेरच्या कोणत्याही घराणेसम्राटाला नगरचे प्रतिनिधित्व करता येणार नसल्याचेही ॲड. गवळी यांनी सांगितले आहे.

लोकभज्ञाक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नगरच्या कल्याणासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी केली आहे. यासाठी लोकभज्ञाक चळवळीचे ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरूडे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!