बिरोबा दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड एक रकमी ठेव परत करुन बोनस म्हणून साखर वाटप

0
156

सर्वात जास्त दूध पुरविणार्‍या पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिस देऊन सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे घोरपडवाडी (ता. राहुरी) येथील बिरोबा दूध संकलन केंद्रातर्फे वर्षभरात दूध पुरवठा करणार्‍या दूध उत्पादकांसाठी एक रकमी ठेव परत करुन बोनस म्हणून साखरेचे वाटप करण्यात आले. तर  सर्वात जास्त दूध पुरविणार्‍या पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना व त्यानंतर अतिवृष्टीचा फटका बसलेल्या दूध उत्पादक शेतकरी वर्गाने बोनसची भेट मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोनस वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बिरोबा दुध संकलन केंद्राचे चेअरमन गणेश तमनर, भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष (आबा) शिंदे, अविनाश गाडे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी कोंडीराम वडीतके, दिपकराव तनपुरे, भांड, चिंचाळे, ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाबासाहेब कोळसे, चिंचाळे ग्रामपंचायत तंटामुक्तीचे अध्यक्ष मुरलीधर गडदे आदी उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत करुन गणेश तमनर यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला. जिल्हा बँकेचे संचालक तथा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी बिरोबा दूध संकलन केंद्र संकाटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी आधार ठरला. शेतमाला भाव नसताना शेतकरी पुढे कोरोना व अतिवृष्टीचे संकट होते. या परिस्थितीमध्ये दूधाच्या जोडधंद्यातून ते सावरले असल्याचे स्पष्ट केले.

वर्षभरात जास्तीत जास्त दुधपुरवठा करणार्‍या दुध उत्पादकांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेले रावसाहेब मारुती शेंडगे यांना 1 लाख 16 हजार एकरकमी ठेव परत करून बोनस म्हणून 326 किलो साखर, द्वितीय राजू देवकाते यांना 1 लाख एक रकमी ठेव परत करून 280 किलो साखर तर तृतीय क्रमांक पटकावणारे विजय नारायण झावरे यांना 60 हजार रुपये एक रकमी ठेव परत करून 150 किलो साखर देण्यात आली. तसेच तिन्ही दुध उत्पादक शेतकर्‍यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व उत्पादकांना साखर, मिठाई बॉक्स, चांदीच्या नाण्यासह साबण आदी भेटवस्तू देण्यात आल्या.

बिरोबा दूध संकलन केंद्राचा पारदर्शक कारभार, वेळेवर पगार, गुणवत्तापूर्ण दूध, अडचणीच्या वेळी झालेला आर्थिक आधार, दूध उत्पादनात झालेली वाढ, स्पर्धेच्या युगात जास्तीचा दिलेला दूध दराची माहिती दूध संकलन केंद्राचे संस्थापक नारायणराव तमनर यांनी दिली.तर जनावरांच्या खुरकुत व लंपी आजारासाठी लसीकरण पशुधन विभागामार्फत व्हावे अशी विनंती केली. विकास गडदे, भाऊसाहेब शेंडगे यांच्यासह उपस्थितांची आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.आभार चिंचाळे ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब वडितके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here