बुरुडगाव रोड समर्थ नगर येथे मा. उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून १५ फूट उंचीच्या 21 वटवृक्षाची लागवड
शासनाच्या वृक्षारोपणाची योजना कागदावरच व फोटोसेशन पुरती राबवली जाते – मा. उपमहापौर गणेश भोसले
नगर : शासनाच्या वृक्षारोपणाची योजना बहुतांश कागदावर राहत असून फक्त फोटोसेशन पुरती राबवली जात आहे, कोट्यावधी रुपये खर्च करून पुढील वर्षी त्याच खड्ड्यामध्ये वृक्ष लागवडीचे काम केले जात असते, नागरिकांना बरोबर घेऊन वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी करणे गरजेचे आहे, वृक्षाच्या माध्यमातून मोफत नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण होतो, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व संपूर्ण जगाला पटले असून आपण त्या काळात कृत्रिम ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो,वृक्षांचे अनेक फायदे असून वृक्षावर प्रत्येकाने प्रेम करावे, वृक्षतोड करण्यापेक्षा दोन झाडे लावून त्याचे संवर्धन करावे, दरवर्षी विविध झाडे लावून त्याचे जतन व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे, हरित प्रभाग स्वच्छ प्रभाग या संकल्पनेतून विकासाची कामे सुरू आहेत या कामासाठी नागरिकांचे सहकार्य देखील लाभत असते असे प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
बुरुडगाव रोड समर्थ नगर येथे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून १५ फूट उंचीच्या 21 वटवृक्षाची लागवड करताना माजी उपमहापौर गणेश भोसले, तुषार बोगावत, जेठाभाई पटेल, दादा कुल्लाळ, बाळासाहेब सांगळे, संदीप जंगम, रणसिंग आदी उपस्थित होते.
चौकट :
बुरुडगाव रोड समर्थ नगर रस्त्याच्या कडेला प्रत्येकी सुमारे ३ हजार रुपयांच्या किमतीच्या 21 वटवृक्षाची लागवड केली आहे, हे वृक्ष ३ वर्षाचे असून ते १५ फूट उंचीचे आहे जेणेकरून लवकरच याचे रूपांतर वटवृक्षात होत असते व देखभालीचा प्रश्न निर्माण होत नाही वटवृक्षाच्या माध्यमातून पर्यावरण समतोलनाचे काम होत असते, आजपर्यंत प्रभागात लावलेले वृक्ष मोठे झाले असून त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले आहे, फक्त वृक्षारोपण करून आम्ही थांबत नाही तर त्याचे संवर्धन देखील करतो, वृक्ष लावल्यावर त्याची वाढ होण्यासाठी देखभाल केली जाते. लावलेल्या वृक्षांना स्व खर्चाने टँकरद्वारे पाणी घातले जाते असे मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
- Advertisement -