बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वर्धापनदिनानिमित्त कृषी मार्गदर्शन व मोफत माती परीक्षण शिबिर

- Advertisement -
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे 
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित बॅंक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत, भिगवण येथील ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने कर्जत येथे शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये कांदा लागवड व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन व ८७ शेतकऱ्यांची मोफत माती नमुना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
हा उपक्रम संपूर्ण कांदा हंगामात सुरू राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तज्ञ मार्गदर्शकांचे नियमित मार्गदर्शन मिळणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या भिगवण येथे असलेल्या मृदा संशोधन केंद्रामार्फत ८७ शेतकऱ्यांचे मोफत माती नमुना तपासणी करून त्या सर्व शेतकऱ्यांना खताचे योग्य नियोजन करुन देण्यात येणार आहे.कांदा हे असं पीक आहे जर त्याच योग्य नियोजन नाही केलं तर तो शेतकऱ्याला सुद्धा रडवू शकतो. त्यामुळे त्याच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन शुल्कामध्ये घट व्हावी व उत्पादनामध्ये वाढ व्हावी, हा उद्देश घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्रने हा उपक्रम सुरू केल्याचे ग्रामीण विकास केंद्र भिगवणचे प्रभारी अधिकारी उमेश निकम यांनी उपस्थित शेतकर्‍यांना सांगितले.कार्यक्रमाच्या ठिकाणी ८७ शेतकऱ्यांचे माती नमुने गोळा करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाच्या फलोत्पादन विभागाचे प्रा. डॉ. सचिन मगर उपस्थित होते. अहमदनगरचे सीपीसी इन्चार्ज दादासाहेब कुंभार यांनी  बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. पोपट लकडे यांनी माती परिक्षणाचे महत्त्व सांगितले.
यावेळी कर्जतचे शाखाधिकारी सुनील मांडे, माहिजळगावचे शाखाधिकारी सौरभ तिवारी आणि बाळकृष्ण पाटील, समन्वयक मार्डेफ उपस्थित होते. देवा फलफले यांनी सुत्रसंचालन केले. उमेश निकम यांनी आभार मानले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!