बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेल्या हायब्रीड वाहनांना मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेल्या हायब्रीड वाहनांना मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीला शोरुममध्ये गर्दी दिसून आली. गुढी पाडव्याच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

वासन टोयोटात दिवसभरात तब्बल 28 चारचाकी वाहनांचे ग्राहकांना वितरण करण्यात आले. गाडीची विधीवत पूजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. संपुर्ण कुटुंबीयांसह वाहन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे शोरुमचा परिसर गजबजला होता. वासन ग्रुपचे प्रमुख विजय वासन व तरुण वासन यांनी गुढी पाडव्याच्या ग्राहकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, सहाय्यक व्यवस्थापक दिपक जोशी, सेल्स मॅनेजर सौरभ क्षोत्री, टीम लीडर प्रविण जोशी, रविंद्र थोरात, संदिप काकड आदी सेल्स टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्‍यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देवून कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा अधिक कळ दिसून आला. मोठ्या वाहनात फॉर्च्यूनर व सिटी व्हिकल म्हणून ग्लांजाला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. तर बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेली हायरायडर ही हायब्रीड वाहनाला देखील अधिक मागणी आहे. यापूर्वी कार उत्पादन क्षेत्रात मायक्रो चीपचा तुटवडा भरुन निघाल्याने कारचे ठराविक मॉडेलला अधिक काळ प्रतिक्षा न करता ग्राहकांना लवकरात लवकर वाहन उपलब्ध होत असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!