बेवारस मनोरुग्णांना आधार देणार्‍या मानवसेवा प्रकल्पाला पिठाची गिरणी भेट

0
140

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद दळवी यांच्या दातृत्वाची प्रचिती

अहमदनगर प्रतिनिधी – रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांना आधार देऊन पुनर्वसनासाठी कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास प्रसाद दळवी यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त पिठाची गिरणी भेट दिली.

अरणगाव सोनेवाडी शिवारात मानवसेवेचे कार्य सुरु आहे. या प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या निराधार मनोरुग्णांसाठी शहर आणि आजूबाजूच्या गावातून दोन ते तीन कि.मी. ची पायपीट करत दळण आनण्यासाठी जावे लागत होते.पावसाळ्यात तर प्रकल्पाच्या स्वयंसेवकांना मोठी कसरत करावी लागत होती.ही अडचण लक्षात घेऊन अरणगाव येथील दळवी यांनी मुलाच्या इतर खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविला.

यावेळी मानवसेवा प्रकल्पाचे समन्वयक सुशांत गायकवाड, सुरेखा केदार, अविनाश पिंपळे, प्रकल्पाचे देणगीदार सागर खेत्रे, शिवदास चव्हाण, सोहम दळवी, बबनराव दळवी, अभिषेक पडोळे, दत्तात्रय पडोळे, संगिता पडोळे, ओंकार कापरे उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटानंतर संस्थेला देणगी व मदत मिळणे कमी झाले आहे. मानवसेवा प्रकल्पाचे कार्य पुर्णत: जनतेच्या मदतीवर सुरु आहे.या सामाजिक कार्यासाठी दानशूरांनी व्यक्तींनी पुढे येऊन निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here