बोधेगाव फार्मसी कॅम्पसमधील श्रीगणेशाचे विसर्जन

0
124

शेवगाव प्रतिनिधी-
सालाबादप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.गत वर्षाप्रमाणे याही वर्षी कोरोनाच सावट असल्याकारणाने कोरोनाच्या शासकीय नियमाचे पालन करत आज 7व्या दिवशी महाविद्यालयात प्रतिष्ठापना केलेल्या श्रीगणेशाचे विसर्जन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वशिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या सात दिवसांच्या कालखंडात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते दररोज आरतीचे नियोजन करण्यात आले. यात पालकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

बोधेगाव येथील फार्मसी कॅम्पस मधील श्री गणेशाची मिरवणूक ही पंचक्रोशीत गाजलेली मिरवणुक होती. लेझीम, झांज, ढोलताशे आदी पथक तसेच विविध आकर्षक देखावे हे या मिरवणुकीचे आकर्षणाचे वैशिष्ट्य होते परंतु दोन वर्षापासून जगावर आलेल्या या महामारी कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी अगदी साधेपणात श्री. गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेश मोकाटे बी. फार्मसी चे उपप्राचार्य श्री. भरत जाधव यांनी देशावरील कोरोनाचे सावट लवकर जाऊ दे व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालय गजबजून जाऊ दे असे श्री. चरणी साकडे घातले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे सचिव ॲड.विद्याधर काकडे साहेब जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा काकडे शैक्षणिक विभाग प्रमुख श्री.लक्ष्मण बिटाळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here