अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू मनपाला इशारा
अहमदनगर प्रतिनिधी – गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली फेज टू पाणी योजना बोल्हेगाव,नागापूर परिसरामध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करावी,या परिसरामध्ये फेज टू पाणी योजनेचे पाईप टाकून झाले आहे.तरी काही भागमध्ये पाणी पोहचले नाही विविध ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असून तातडीने दुरुस्ती करून या भागामध्ये नागरिकांना पूर्ण दाबाने लवकरात-लवकर पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी मनपा प्रशासनाला दिला.
बोल्हेगाव,नागापूर परिसरात नागरिकांना फेज टू पाणी योजनेतून पाणीपुरवठा करावा यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशा सूचना नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी पाहणी दरम्यान मनपा पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते यांना दिल्या यावेळी नगरसेवक ॲड.राजेश कातोरे व फेस टू पाणी योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुमार वाकळे म्हणाले की,बोल्हेगाव,नागापूर परिसरामध्ये दिवसेंदिवस मोठी लोकवस्ती वाढत आहे.त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तरी फेस टू पाणी योजना लवकरात-लवकर सुरू करणे गरजेचे आहे.मनपा प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व तातडीने उपाययोजना कराव्यात व ही योजना सुरू करावी असे ते म्हणाले.