बोल्हेगाव चोभे कॉलनी येथील नागरी समस्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महापौर यांना निवेदन.

0
96

अहमदनगर (प्रतिनिधी)-  बोल्हेगाव चोभे कॉलनी येथील नागरिकांना सेफ्टी टँक नगरसेवक संजय शेंडगे यांनी झाकण काढून तिथला उपसा करून नागरिकांना सहकार्य केले होते व ते तसेच असल्याने तेथे झाकण किंवा संरक्षण भिंत कंपाऊंड करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शहर अभियंता सुरेश इथापे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, मा नगरसेवक संजय शेंडगे यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, भाऊसाहेब कोहकडे, दिलीप साळवे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी (ऊस तोड कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेचे सागर चाबुकस्वार, सुनील गटांनी, बाळू कसबे, चंद्रकांत जाधव, सुवर्ण ब्राह्मणे, महादेव माने, शोभा पालवे, सुनिता वानखडे, जया मोकळ, मंगल परहार, विवेक विधाते, नवीन भिंगारदिवे, बेबीताई टकले, आशाबाई पठारे आदी उपस्थित होते.

बोल्हेगाव चोभे कॉलनी येथील सेफ्टी टँक अद्याप 3 वर्षापासून आजही आहे त्या परिस्थितीत सेफ्टी टँक ओपन आहे  आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन निदर्शनास आणले होते की अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही धोकादायक असलेले सेफ्टी टँक येथे लहान मुले खेळताना मागील काही दिवसांपूर्वी खेळताना लहान मुलाचा झोक गेला परंतु नागरिकांना मुलाला वाचवण्यात यश आले व तसेच येथे जनावरे चरताना त्यामध्ये  पडतात व येथे सेफ्टी टँगची दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे व  नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच यापुढे जीवित हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सेफ्टी टँक च्या बाजूला असलेले सदर कॉलनीचा ओपन स्पेस सदर जागेवर ती बाजूचे शेतमालक त्याठिकाणी कब्जा करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे व तेथील रहिवासीना दादागिरीची भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी देत आहे तरी वरील सर्व बाबी गांभीर्याने लक्षात घेऊन लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे तसेच या सर्व जागेला संरक्षण म्हणून व्यवस्था करण्यात यावे अन्यथा सर्व रहिवासी येत्या आठ दिवसाच्या आत प्रश्ननसुटल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका येथे मुक्कामी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here