बोल्हेगाव येथील गांधीनगर,महादेव मंदिर,आंबेडकर नगर,मोठा मारुती या परिसरामध्ये संपूर्ण रस्ता खराब झाल्याचा आरोप.

0
34

रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील गांधीनगर, महादेव मंदिर, आंबेडकर नगर, मोठा मारुती या परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून या रस्त्यावरून जाताना येताना वयस्कर व्यक्ती तसेच शाळेतील विद्यार्थी यांना मोठे कसरत करावी लागत आहे. एक वयस्कर महिला त्याच रस्त्यावरून जात असताना पाय घसरल्याने खाली पडून पाय फ्रॅक्चर झाले. तरी लवकरात लवकर या परिसरात मनपा प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान व नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त व नगरसेवक संजय शेंडगे यांना निवेदन देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे, विजय पाथरे, कैलास डहाळे, जयश्री शिंदे, संगीता रोमन, जिजाबाई भालेराव, इमरान पठाण, सोनाली भालेराव, रियाज शेख, शमा शेख, पूनम मकासारे, मंगल चिंचकर, सविता काळे, पुष्पा पाटोळे, सुधीर सावडेकर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here