जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
जामखेड तालुका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे आपल्या सामाजिक, धार्मिक, कामाबद्दल प्रसिद्ध आहे. खास दिपावली निमित्त खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यात तसेच विंचरणा नदीकाठी भगवान शिवशंकर मुर्तीसमोर हजारो मशाली पेटवून फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले,
पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, मनसे अध्यक्ष प्रदीप टाफरे, राजू गोरे, खंडागळे नाना, सचिन पवार सह मोठ्या प्रमाणावर शिवभक्त हजर होते.
मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकून निजामाचा पराभव केला होता याचा साक्षीदार असलेला खर्डा येथिल शिवपट्टण किल्ल्यावर हजारो मशाली पेटवून फटाक्यांच्या आतषबाजीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर मानवंदना दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली व सध्याच्या परिस्थितीत महाराजांचे विचार किती महत्वाचे आहेत हे पांडूराजे भोसले यांनी सांगितले.
एक आदर्श राज्यकर्त्या अनेक समाजोपयोगी कामे करणार्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यात हजारो मशाली पेटवून फटाक्यांच्या आतषबाजीने दिपोत्सव साजरा केला.
याचबरोबर जामखेड येथे विंचरणा नदीच्या काठावर असलेल्या भगवान शंकराच्या मुर्तीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती ठेवून समोर हजारो मशाली पेटवून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शंकराची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विधीवत पुजा करण्यात आली.
यावेळी सभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, प्रदीप टाफरे
यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे कौतुक केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या यावेळी मोठय़ा प्रमाणावर शिवप्रेमी हजर होते.