भगूर गावाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण

0
88

सरपंच वैभव पुरनाळे यांचा कौतुकास्पद उपक्रम

शेवगाव प्रतिनिधी-शेवगाव तालुक्यातील भगूर गावाने तालुक्यासमोर नाही तर अहमदनगर जिल्ह्ययासमोर एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे.भगूर येथील अठरा वर्षावरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आज शंभर टक्के पूर्ण झाले.

शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या तालुक्यातील मोजक्या गावांपैकी भगूर हे एक गाव ठरले आहे.८७४ पैकी ८७४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले.भगूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकरणाबद्दल लोकांमध्ये वेळोवेळी जनजागृती केली होती.ज्या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत येण्यास अडचणी येत होत्या अशा अपंग आणि वृद्ध नागरिकांचे लसीकरण घरी जाऊन करण्यात आले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात असताना या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवली असल्याचे आरोग्य सेविका अश्विनी कळमकर यांनी यावेळी सांगितले.

लसीकरण मोहीम नियोजनबद्ध राबविण्यात आल्याने गाव शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले गाव बनल्याचे भगूरचे सरपंच वैभव पूरनाळे यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेसाठी घोटण प्रा.आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.शिरसाट,शेवगाव पं.स.गटविकास अधिकारी महेश डोके साहेब,विस्ताराधिकारी पाटेकर साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संकल्प लोणकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.तर डॉ.गजेंद्र खांबट,आरोग्य सेविका अश्विनी कळमकर,अनुसया म्हस्के,राजेंद्र कोठुळे,आशा वर्कर हिरा पठाडे,तसेच भगुरचे सरपंच वैभव पुरनाळे व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here