अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी व बारावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
आवड असलेल्या क्षेत्राकडे वळा – छायाताई फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (एस.एस.सी.) व बारावी (एचएससी) बोर्डाच्या परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या तिन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या गुणगौरव कार्यक्रमास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त मंडळाचे सदस्य ॲड. किशोर देशपांडे, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाच्या सदस्या पुष्पाताई फिरोदिया, सुनिता मुथा, भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रूपीबाई बोराचे मुख्याध्यापक अजय बारगळ आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या एकत्रित मेहनतीने विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. 99 टक्के पर्यंत विद्यार्थ्यांनी मजल मारली असून, मुली आघाडीवर असल्याचे अभिमान वाटत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक वाटा असून, आवड असलेल्या क्षेत्राकडे वळून यश मिळविण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रकाश गांधी म्हणाले की, दहावी व बारावी हे जीवनाचा पहिला टप्पा आहे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात स्वतःच्या पायावर उभे राहून, समाजाची सेवा करा. यशस्वी होताना समाज, शिक्षक, आई-वडील व शाळेला विसरू नका. ध्येय ठेऊन वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शुभांगी जोशी यांनी वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या नावांची घोषणा रविंद्र पंडित यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले. आभार मनीष कांबळे यांनी मानले.
या गौरव सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावी बोर्डात शालेय गुणवत्ता यादीत चमकलेल्या पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.:-
इयत्ता दहावी (एस.एस.सी.) भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रथम- सिध्दी घाणेकर (99.20 टक्के), द्वितीय- शताक्षी कुलकर्णी, शिवम तिवारी (97.40 टक्के), तृतीय- आदिती भोंडवे (97.20 टक्के), चौथी- चैत्राली कुलथे, सुरज तरटे (96.60 टक्के), पाचवा- रचेत काबरा, ओजस कुलकर्णी (96.40 टक्के), संस्कृत विषयात सिध्दी घाणेकर, शताक्षी कुलकर्णी, पर्वणी बडदे व शर्वरी मांढरे यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले असून, शाळेचे 77 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहे.
अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल प्रथम- सिध्दी मते (97.60 टक्के), द्वितीय- सृष्टी मैड (95.20 टक्के), तृतीय- रोहन अडसरे (94.80 टक्के), चौथा- क्रिष्णा तानवडे (94.60 टक्के), पाचवा- प्रकृत गुजराथी (93.20 टक्के), 24 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले.
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल प्रथम- अथर्व आठरे (93 टक्के), द्वितीय- यशश्री टांगळ, प्रिती कुमटकर, साई भिसे (92.80 टक्के), तृतीय- प्रमोद गव्हाणे (92.60 टक्के).
इयत्ता बारावी (एचएससी) भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल शास्त्र विभाग प्रथम- स्वराली शित्रे (90.17 टक्के), द्वितीय- समर्थ सावंत (88.33 टक्के), तृतीय- विक्रांत कुलकर्णी (85.33 टक्के), समर्थ सावंत याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. वाणिज्य विभाग प्रथम- निधी कटारिया (88.50 टक्के), द्वितीय- सिध्दी मुनोत (88.30 टक्के), तृतीय- भक्ती गांधी, आयुष गांधी (87.83 टक्के), भक्ती गांधी हिने अकाऊंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले.
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज शास्त्र विभाग प्रथम- सानिया आंबेकर (79.50 टक्के), द्वितीय- तेजस्विनी कोतकर (73.33 टक्के), स्नेहा विश्वकर्मा (68.33 टक्के).
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल शास्त्र विभाग प्रथम- जान्हवी जाधव, पुनम चांदणे (63.17 टक्के), द्वितीय- आर्या कर्डिले, सृष्टी सोनकांबळे (60 टक्के), कला शाखा प्रथम- सृष्टी कमलकर (90 टक्के), द्वितीय- आराध्या नरवडे (83.50 टक्के), स्नेहल दळवी (70.50 टक्के).