भाजप पक्षाचे ध्येयधोरण समाजातील घटकापर्यंत पोचविण्याचे काम करणार – चंद्रकांत पाटोळे.
अहमदनगर प्रतिनिधी – भाजपा अनुसूचित जाति मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून मोठ्या संख्येने युवकांनी अनुसूचित जाति मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, उत्तर महाराष्ट्र प्रभारी अँड.वाल्मीक निकाळजे, अनुसूचित जाति मोर्चा चे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे राज्य सचिव मनेष साठे, अँड. विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, दत्ता गाडळकर, विशाल खैरे, बाळासाहेब गायकवाड, पंकज जहागिरदार आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटोळे म्हणाले की भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, तसेच सचिव पदाच्या नियुक्त्या या कार्यक्रमात जाहीर करण्यात आल्या.त्याच बरोबर शहरातील अनुसूचित जाती जमाती मधील युवकांनी भाजप पक्षामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला व तसेच पक्षाचे ध्येयधोरण समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार व पक्ष बळकटीकरण करण्याचे कार्य जोमाने करणार असल्याची भावना अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले की भाजप पक्ष हा लोकशाही मार्गाने काम करणारा पक्ष आहे इतर पक्षांमध्ये घराणेशाही व आदेशानुसार काम केले जाते भाजप पक्षात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले जाते.पक्षाच्या नेत्या वर प्रेम करण्यापेक्षा पक्षाच्या विचारावर प्रेम करून एकनिष्ठ राहावे.
भाजप पक्षात चांगले काम करणाऱ्यांना एक दिवस नक्कीच चांगली संधी मिळत असते पक्षाचे पद हे समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देत असते पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागेल असे काम कोणीही करू नये कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भाजप ची ओळख असे प्रतिपादन गंधे यांनी व्यक्त करून सर्व युवकांचे पक्षामध्ये स्वागत करण्यात आले.