भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नियुक्त्या जाहीर ;शहरातील युवा वर्गाने घेतला भाजपचा झेंडा हाती

0
89

पक्षाच्या नेत्यांवर प्रेम करण्यापेक्षा पक्षाच्या विचारांवर प्रेम करा – महेंद्र भैय्या गंधे

अहमदनगर प्रतिनिधी – भाजप पक्ष हा लोकशाही मार्गाने काम करणारा पक्ष आहे इतर पक्षामध्ये घराणेशाही व आदेशानुसार काम केले जाते.आपल्या पक्षात कार्यकर्त्यांला विश्वासात घेऊन काम केले जाते.पक्षाच्या नेत्यांवर प्रेम करण्यापेक्षा पक्षांच्या विचारावर प्रेम करून एकनिष्ठ राहावे भाजप पक्षात चांगले काम करणाऱ्याना एक दिवस नक्कीच चांगली संधी मिळत असते. पक्षाचे पद हे समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देत असते,पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लागेल असे काम कोणीही करू नये कार्यकर्त्यानां न्याय देणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे असे प्रतिपादन महेंद्र भैय्या गंधे यांनी व्यक्त केली.

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नियुक्त्या व प्रवेश सोहळ्या प्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे, उत्तर महाराष्ट्र प्रभारी ॲड. वाल्मीक निकाळजे,अनुसूचित जाति मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे,राज्य सचिव मनेष साठे,ॲड.विवेक नाईक,मा.नगरसेवक सुवेंद्र गांधी,दत्ता गाडळकर,विशाल खैरे,बाळासाहेब गायकवाड,पंकज जहागीरदार आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उत्तर महाराष्ट्र प्रभारी ॲड.वाल्मीक निकाळजे म्हणले की,दलित समाज हा विघटित झाला आहे विखुरलेले तुकडे एकत्रित येत नाही तोपर्यंत समाजाचा उद्धार व विकास होणार नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या कल्याणासाठी व आर्थिक उन्नतीसाठी 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 3.5 लाख कोटी रुपये अनुसूचित जाती साठी राखीव ठेवला आहेत,भाजप हाच पक्ष अनुसूचित जाती समाजाला न्याय देऊ शकतो आत्तापर्यंत इतर पक्षाने या समाजाचा फक्त मतदानासाठी वापर करून घेतला आहे असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटोळे म्हणाले की,भाजपा अनुसूचित जाति मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष पदाच्या व मंडल अध्यक्षच्या तसेच सचिव पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत याचबरोबर शहरातील अनुसूचित जाती-जमाती मधील युवकांनी भाजप पक्षामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे.पक्षाचे ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही सर्वजण करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here