कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
आरोग्य विभागातील क व ड श्रेणीतील परीक्षा राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे व नियोजन शून्य व्यवस्थेमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक त्रास देण्याचं काम राज्य सरकारकडून होत असल्याने,या ढिसाळ कारभाराला कुठे तरी चाप बसावा यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीने कर्जत येथे राज्य सरकार विरोधात तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले.
निवेदनावर भाजप विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम भिसे आदित्य भोज,ओंकार धारूरकर,शुभम अल्हाट,संघर्ष पवार,त्याचप्रमाणे भाजपचे शहराध्यक्ष वैभव शहा,अनिल गदादे, विनोद दळवी,गणेश शिरसागर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
“या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,संपूर्ण प्रकारातुन असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अत्यंत बेफिकीर आहे. राज्य सरकारने तात्काळ परीक्षा घ्याव्यात अन्यथा ‘भाजपा विद्यार्थी आघाडी कर्जत शहराच्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल,तसेच निष्क्रिय आरोग्य मंत्री यांचा राजीनामा मिळावा, कुठेतरी ह्या राजेश टोपेंना शेतकरी,गोरगरीब,मजदूर, कामगार वर्गातील लोकांच्या मुलांना पुढे येऊ द्यायचे आहे की नाही हा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य विध्यार्थ्याला आज पडत आहे.असे निवेदनात म्हटले आहे.