भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल.

 

महा रॅलीचे रूपांतर विजय रॅलीमध्ये झाले – आ.संग्राम जगताप

नगर : लोकसभा निवडणुकीबाबत अहमदनगर दक्षिण मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर शहरातून काढण्यात आलेल्या विजय रॅलीचे ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने स्वागत करत फुलांचा वर्ष करण्यात आला.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना केलेल्या विकास कामावर मतदान रुपी आशीर्वाद मागत आहे. नगर शहरातील जनता ही विकासाच्या कामालाच मतदान करतील खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदार संघामध्ये विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या आहे. त्यामुळे या महा रॅलीचे रूपांतर विजय रॅलीमध्ये झाले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 2024 चे लोकसभेचे खा.डॉ.सुजय विखे पाटीलच होतील असे ते म्हणाले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!