कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्ष पदी नंदादीप डेव्हलपर्सचे संचालक शरद (अण्णा) मेहेत्रे यांच्या नियुक्तीचे पत्र मा.मंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.आमदार व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर,मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथील ओबीसी लोकजागर अभियानाच्या मेळाव्या प्रसंगी देण्यात आले.
या यावेळी माननीय नवनियुक्त ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष शरद (आण्णा) म्हेत्रे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी च्या तालुक्यातील सर्व आघाड्यासोबत लवकरच बैठक बोलावून ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.
या निवडी बद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील गावडे,मा.श्री.अंबादासजी पिसाळ,दादासाहेब सोनमाळी, सुवेन्द्र गांधी,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉ.सौ.कांचनताई खेत्रे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष माननीय अशोक काका खेडकर,भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे तालुका जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुनील काका यादव,भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन भैय्या पोटरे, शहर अध्यक्ष वैभव शहा,अल्लाउद्दीनजी काझी, शांतीलाल कोपनर,पप्पुशेठ धोदाड,काकासाहेब धांडे, गणेश क्षिरसागर,गणेश पालवे,अनिल जाधव यांनी अभिनंदन केले.
यावेळी.मा.अनिल भैय्या गदादे,विनोद दळवी,काकासाहेब अनारसे,विलास जांभूळकर,डॉ.विलास राऊत,राजेंद्र येवले आदि मान्यवर उपस्थित होते.