भारती विद्यापीठ गणित परिक्षेत सविता रमेश फिरोदिया प्रशालेचा आरव रासकर राज्यात प्रथम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भारती विद्यापीठ गणित परिक्षेत सविता रमेश फिरोदिया प्रशालेचा आरव रासकर राज्यात प्रथम

नगर – भारती विद्यापीठ, पुणे यांच्यामार्फत आयोजित इंग्रजी व गणित परिक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये नगर येथील सविता रमेश फिरोदिया प्रशालेचा इ.4 थीचा विद्यार्थी आरव संदिप रासकर हा राज्यात गणित विषयात पहिल्या क्रमांकाने गुणवत्ता  यादीत चमकला आहे.

या परिक्षेत गणित व इंग्रजी विषय मिळून 356 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा 81 टक्के निकाल लागला. या अगोदर चि.आरव हा प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात पाचवा आला आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडून तयारी करुन घेण्यात येत आहे. विद्यार्थींही आपल्या मेहनतीने विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा, परिक्षेत चमकत संस्थेचे नाव उज्वल करत आहेत. चि. आरव याने मिळविलेले यश हे शाळेच्या लौकिकात भर घालणार असल्याचे सांगितले.

शिशु संगोपन संस्थेच्यावतीने चि.आरव रासकर याचा गौरव करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल त्याचे संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हा.चेअरमन दशरथ खोसे, सेक्रेटरी र.धों.कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजय मुनोत, सौ.रश्मी येवलेकर, ब.ना.नन्नवरे, मनसुखलालजी पिपाडा, आर.एम.गुंदेचा, चंद्रकांत आनेचा, अभय गांधी, एल.के.आव्हाड, मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.

चि.आरव यास सौ.मनिषा कार्ले, सौ.मनिषा पालवे, सौ.जयश्री कोदे, मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!