भारत सरकार नोटरी पब्लिक पदी नियुक्ती झाल्याबद्दल साळी समाज बांधवांचा सत्कार
वकिली क्षेत्रात समाज बांधवांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे समाजाच्या नावलौकिकात भर – सतिश झिकरे
नगर – समाज एक संघ राहण्यासाठी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. प्रत्येकाचा समाज बांधवांशी परिचय व्हावा हा हेतू ठेवून समाजात छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक कार्यासोबतच शैक्षणिक कार्यातही स्वकुळसाळी संवर्धक मंडळ अग्रेसर आहे.समाजाच्या प्रगतीसाठी संस्थेचे सर्व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड झालेल्या सर्व समाज बांधवांचे मी अभिनंदन करतो.वकिली क्षेत्रात समाज बांधवांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे समाजाच्या नावलौकिकात भर पडलेली आहे.असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे कार्यकारणी अध्यक्ष सतीश झिकरे यांनी केले आहे.
बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ व जिव्हाळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार नोटरी पब्लिक पदी निवड झालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कार मुर्ती अँड.मंगेश दिवाणे (सरकारी वकील),अ.नगर डिस्ट्रिक्ट नोटरी असो.चे अध्यक्ष अँड.सुधीर भागवत,अँड समीर वखारे,अँड गणेश कांबळे,अँड शामसुंदर दळवी, सरकारी वकील अँड रत्ना दळवी -विंचुरकर,अँड अनिता दिघे,अँड महेश ओहोळ तसेच नायब तहसीलदार नितीन शेकटकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे,कार्याध्यक्ष सतीश झिकरे, जितेंद्र लांडगे,सचिव गजेंद्र सोनवणे, खजिनदार संजय सागांवकर,अरुण तरोटे,सचिन मडके,विक्रम पाठक,महेश कांबळे,चंद्रकांत मानकर, निलेश मिसाळ,वनिता पाटेकर,छाया साळी,शुभदा वल्ली,नरेश कांबळे तसेच जिव्हाळा प्रतिष्ठानचे सुनील पावले,विठ्ठल पाठक,ओहोळ संजय,अरुण दळवी, मिना साळी, सुधाकर साळी,चंद्रशेखर पिंपरकर,सुरेश इंगळे आदी उपस्थित होते.
सुनील पावले म्हणाले, जिव्हाळा प्रतिष्ठानने एप्रिल महिन्यापासून साळी समाजाचे जनगणना करण्याचे कार्य कार्य सुरू करणार आहे.तरी सर्व समाज बांधवांनी जनगणने च्या कार्यात सहकार्य करावे. वकिली क्षेत्रात समाज बांधवांनी उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांची भारत सरकार नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.
अँड.अनिता दिघे म्हणाल्या,समाजाने केलेल्या सत्कारामुळे मी भारावून गेले आहे.समाजाचा हा सत्कार मला सामाजिक कार्यात नेहमीच प्रेरणा देत राहील.
सत्काराला उत्तर देताना अँड.गणेश कांबळे म्हणाले,वकिली क्षेत्रात समाज बांधव अनेक वर्षांपासून काम करीत आहे. समाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले.
अँड.शामसुंदर दळवी व अँड.रत्ना दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृष्णा बागडे यांनी केले तर आभार अरुण दळवी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी साळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.