भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच कॅन्टोमेंटचे अधिकारी यांची पालकंत्र्यांसह संयुक्त बैठक लावणार – आ.संग्राम जगताप

- Advertisement -

भिंगारचे विजय लाईन चौक हायमॅक्सच्या प्रकाशाने उजळले

आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून विजय लाईन चौकात हायमॅक्स

अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार येथील विजय लाईन चौकातील श्रेयस टॉवर येथे आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून हायमॅक्स बसविण्यात आले.या हायमॅक्सचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी पै.प्रमोद जाधव, वडारवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच आरती तागडकर,ग्रामपंचायत सदस्य राजकुमार ईटेवाड,महापालिकेचे अधिकारी मेहेर, लहारे, उद्योजक लोकेश मेहेतानी,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे,विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे, विशाल बेलपवार,विलास तोडमल, मतीन ठाकरे, पंकज भूतारे, दिपक अमृत, अजिंक्य भिंगारदिवे,दिपक लिपाणे,जयकर, प्रकाश राठोड, योगेश नागपुरे, किरण पानमळकर, आनंद  सदलापूरकर, नितीन सरोदे, अमित काळे, मंगेश मोकळ, अभिषेक भगवाने, सिद्धार्थ आढाव, अक्षय नागापुरे, सुजन भिंगारदिवे,निखिल चाबुकस्वार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिंगार मधून जाणार्‍या विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुक दिवसंदिवस वाढत आहे. भिंगार येथील विजय लाईन चौकातून हा रस्ता जात असल्याने या भागात रात्री अंधकार होत होता. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन अनेक लहान मोठे अपघात घडत होते.
नागरिकांच्या प्रश्‍नाची दखल घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी तात्काळ हायमॅक्सची व्यवस्था करुन दिली. भिंगारच्या प्रश्‍नासाठी आमदार जगताप यांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचे संजय सपकाळ यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की,शहरातील इतर उपनगराप्रमाणे भिंगारची देखील झपाट्याने वाढ व विकास होत आहे.भिंगारचे काही प्रश्‍न केंद्र स्तरावरील असल्याने ते सोडविण्यास अडचण निर्माण होत आहे.मात्र त्याचा पाठपुरावा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाणी व रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यात आले आहे.शहराच्या धर्तीवर भिंगार कचरामुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला असून,भिंगारचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच कॅन्टोमेंटचे अधिकारी यांची पालकंत्र्यांसह संयुक्त बैठक लावणार असल्याचे स्पष्ट केले.
हायमॅक्सचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आमदार जगताप व या प्रश्‍नासाठी पुढाकार घेणारे पै. प्रमोद जाधव यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!