अहमदनगर प्रतिनिधी – आज शुक्रवारी रात्री पहाटे दीड,ते दोन च्या सुमारास भिंगार छावणी परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला भीषण आग लागली.या आगीत नेहरू मार्केट मधील जवळपास १४ ते १५ दुकाने आगीत भस्मसात झाली.यामध्ये तर काही दुकाने या आगीतून बचावली.ही दुकाने टेलर्स,फुल,फ्रुट्स, लॉटरी अशी विविध व्यवसायाची होती.यामध्ये दुकानदारांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले.आग एव्हडी भयानक होती की यामध्ये आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते.
#व्हिडीओ
अहमदनगर महानगरपालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या जवळपास ५ गाड्या घटनास्थळी आग विझवत होत्या.अग्निशामक जवानांनी ही आग विजवण्यास मोठ्या शिथापीने मदत केली.यामुळे आग जवळपास साडेचार ते पाच च्या सुमारास नियंत्रणात आली.
यावेळी आजूबाजूच्या नागरिक व दुकानदारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.पण आगीचे लोळ एव्हडे भयावह होते की तिथे अग्निशमन दलाशिवाय कोणी काहीच करू शकत नव्हते.
या आगीत मोठी वित्तहानी झाली असून संबंदधितांना आर्थिक मदतीची देखील गरज आहे.