भिंगार अर्बन बँकेच्यावतीने नूतन सभापती पुष्पा बोरुडे व अविनाश घुले यांचा सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सभापतीपदाच्या माध्यमातून विकास कामांना चालना देतील – अनिल झोडगे

अहमदनगर प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या कामांना प्राधान्य देऊन नगर विकासासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. नगरसेवक अविनाश घुले व नगरसेविका सौ.पुष्पा बोरुडे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकास कामांना चालना दिली आहे. आता सभापती म्हणून शहराच्या विकासातही ते योगदान देतील असा विश्वास आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे या ध्येयाने काम करत असल्याने आता त्यांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासातही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील, असे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांनी केले.

     भिंगार अर्बन बँकेच्यावतीने मनपा महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन अनिल झोडगे, ज्येष्ठ संचालक नाथाजी राऊत, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, नामदेव लंगोटे, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, कैलास खरपुडे, आर.डी.मंत्री, रमेश परभाने, विजय भंडारी, आर.एस.बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदि उपस्थित होते

     याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, नगरसेवक म्हणून केलेल्या कामांमुळे व सर्व स्नेही व मित्र परिवाराच्या सहकार्याने आपणास सभापतीपदाची संधी मिळाली आहे. नगर शहरात चांगली कामे करुन शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. सत्कारामुळे आपणास काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

     याप्रसंगी पुष्पा बोरुडे म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्याने आपली सभापतीपती निवड झाली आहे. या पदाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहिल. आपणा सर्वांचे पाठबळ आपणास मिळेल, असे सांगितले.

     शेवटी रमेश परभाणे यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!