भिंगार बँकेच्या सभासदांना लाभांश वाटप शुभारंभ

सर्वांच्या सहकार्याने भिंगार बँकेची घोडदौड सुरु राहिल
– चेअरमन अनिलराव झोडगे

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार बँकेने अनेक वर्षांपासून सभासदांबरोबर,खातेदार,ठेवीदार यांना चांगली सेवा दिली.वेळोवेळी आधुनिक बदलांचा स्विकार करुन सेवा उपलब्ध करुन दिल्याने सर्वांचाच बँकेवर मोठा विश्वासनिर्माण झाला आहे.बँकेच्या यशात सभासद, कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिले आहे त्यामुळे बँकेच्या सभासदांना यंदाच्या वर्षी १२ टक्के लाभांश देण्याची केलेल्या घोषणेनुसार लाभांशांचे वाटप सुरु केले आहे.

सभासदांच्या विश्वासावर आजबँक प्रगतीपथावर आहे.त्याचप्रमाणे बँकेचे कर्मचारी ग्राहकांना तत्पर व चांगली सेवा देत असल्याने कर्मचार्‍यांना यंदा २० टक्के बोनस देण्याचे जाहीर करतआहोत.याचबरोबर कोरोना काळातही कर्मचार्‍यांनी ग्राहकांना सेवा देऊन जी कोरोना योद्ध्याची भुमिका बजावली,त्याचा सन्मान म्हणून कर्मचार्‍यांना २१ हजार रुपयांचे बक्षिस बँकेच्यावतीने देण्यात येणार आहे. यापुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने बँकेची घोडदौड अशीच सुरु राहिल,असा विश्वास चेअरमन अनिलराव झोडगे यांनी व्यक्त केला.

भिंगार अर्बन बँकेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या हस्ते करण्यातआला.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी,कॅन्टों.बोर्डचे नूतन उपाध्यक्ष वसंत राठोड,बँक संचालक रमेश परभाने,नाथाजी राऊत,आर.डी.मंत्री,विजय भंडारी विष्णू फुलसौंदर,अमोल धाडगे,एकनाथ जाधव,नामदेव लंगोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन, मच्छिंद्र पानमळकर आदि उपस्थित होते.

याप्रसंगी शशिकांत महाजन म्हणाले,भिंगार बँक ही सर्वसामान्यांचे बँक म्हणून ओळखले जाते.बँकेने आधुनिक बदल स्विकारात खातेदार,ठेवीदारयांना चांगली सेवा देऊन त्यांच्या उन्नत्तीचे काम केले आहे.बँकेचे कर्मचारी ग्राहकांचे हितजोपासातप्रामाणिकपणे कामकरत आहेत.कोरोनासारख्या अडचणी काळातही कर्मचार्‍यांनी आपली उत्कृष्ट सेवा देत सर्वसामान्यांना आधार दिला.

संचालक मंडळाने कर्मचार्‍यांचे सेवेची दखल घेत दिलेला २० टक्के बोनस व २१ हजारांचे बक्षिस यामुळे  कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून,यापुढील काळातही कर्मचारी तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहतील,असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी बँकेच्या सभासदांना लाभांशाच्या वाटप त्यांच्या ऑनलाईन खात्यात जमा करण्यात आले आहे.तसेच ज्यांचे खाते नाही,त्यांनी बँकेच्या जवळच्या शाखातून आपला लाभांश घेऊन जावा,असे आवाहन केले. त्याचबरोबर बँकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी आर.डी.मंत्री,नामदेव लंगोटे, एकनाथ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन नाथाजी राऊत यांनी केले तर आभार अमोल धाडगे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!