भिंगार भागातील आलमगीर नाव बदलुन संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करा – नितीन भुतारे

0
87

औरंगजेबाचे उदात्तीकरण भविष्यात होऊ नये म्हणूनच त्या भागला नाव आलमगीर नको मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहमदनगर प्रतिनिधी – शहरा जवळ भिंगार गावाला लागूनच नागरदेवळे ग्रामपंचायत आहे मोठ्या प्रमाणात या भागात जवळपास 30 ते 40हजारांच्या वर लोकवस्ती आहे त्यातील निम्मा भाग हा औरंगजेबाच्या नावावरून आलमगीर म्हणुन ओळखला जातो काही वर्ष औरंगजेब येथे राहून मुगलशाही चालवायचा त्यानंतरच त्याचा या भागातच मृत्यू झाला व त्याला शेवटची अंघोळ येथे घातली त्याचे थडगे सुध्दा आज येथे आहे त्यामुळे भागला आलमगीर हे नाव पडले ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या विरोधात कुरापती केल्या छत्रपती संभाजमहाराज यांना क्रूरपणे मारले अश्या औरंगजेबाची ओळख आमच्या नगर शहरात नको त्याचे शेवटची अंघोळ घातलेले थडगे हटवा अशी मागणी सुध्दा आम्ही अपनाकडे मुख्यमंत्र्यांना केली होती.

असे यावेळी मनसेचे नितीन भुतारे यांनी सांगितले तसेच या भागात आलमगीर या औरंगजेबाच्या नावामुळे त्याच्या आठवणींना उजाळा मिळतो त्यामुळे काही नालायक आऊलादी त्याचे उदात्तीकरण करतात भविष्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ नये अश्या घटना असे पुन्हा पुन्हा घडू नये कायदा सुव्यवस्था सुरळीत राहणे गरजेचे आहे त्याकरिता औरंगजेबाचे नामोनिशाण या नगर शहराजवळून मिटविणे गरजेचे आहे त्याकरिता नागरदेवळे ग्रामपंचायतीतील त्या भागाचे आलमगीर नाव बदलून संपुर्ण ग्रामपंचायतीला संत सावतामाळी नगर असे नामकरण करावे अशी मागणी मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे तसेच हा लढा या पुढील काळात आम्ही चालु ठेवणार असेही त्यानी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here