भिंगार शहरवासियांशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संवाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

भिंगार शहरवासियांशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संवाद

समान नागरी कायदा ही देशाची मागणी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर : नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिंगार शहरवासियांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, वसंत लोढा, संजय सपकाळ, नरेश चव्हाण, महेश झोडगे, संजय छजलानी, महेश नामदेव, वसंत राठोड, नामदेव लंगोटे, ठकाप्पा लंगोटे,स्मिता अष्टेकर,सचिन जाधव,पोपट पाथरे, आनंद शेळके, सुभाष घोडके, रवींद्र जेवरे,रवींद्र दुगम, पोपट नगरे, विठ्ठल लोखंडे, आदीसह  गवळीवाडा, पटनावर समाज, वाल्मीक समाज,ज्येष्ठ नागरिक संघ भिंगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून देशाच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे. शरद पवार हे लोकसभेच्या दहा जागा लढवणारे राष्ट्रीय अध्यक्ष असून. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षच राहिला नाही ही मंडळी देशाला स्थिरता देऊ शकत नाही. आधी आपले पक्ष सांभाळा मोदींच्या हाती सत्ता दिली म्हणजे देश सुरक्षित राहिला जातो. समान नागरी कायदा करण्यासाठी देशातील नागरिकांची मागणी असून येत्या 13 तारखेला शिक्कामोर्तब   करायचा आहे. देशात आपलेच सरकार येणार आहे प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे.

खा.डॉ सुजय विखे यांना जे मतदान करणार ते हिंदुत्वाला आणि नरेंद्र मोदी यांना असेल. भिंगार शहर हे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे गाव आहे विरोधी पक्षाकडे नेता नाही केंद्र सरकारने 370 कलम रद्द केल्यानंतर भारतवासीयांनी मोठे स्वरूपात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक निर्णय घेतले जातात. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम केले आहे. लोकसभेची निवडणूक ही मनपा, कॅन्टोन्मेंटची नसून देशाची सुरक्षा कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी आहे मंदिरे उभे करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असे ते म्हणाले.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, भिंगार हे गाव नेहमीच भाजप शिवसेना बरोबर राहिले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये हे गाव येत असल्यामुळे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. गवळी समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न निवडणुकीनंतर नक्कीच मार्गी लावला जाईल.भिंगार शहराचे एक एक प्रश्न हाती घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सोडवले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी भिंगार मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश नामदे यांनी सर्वांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!