भिंगार शहर फुले ब्रिगेडच्या वतीने अ‍ॅड.आगरकर, प्रा.विधाते व पानमळकर यांचा सत्कार

- Advertisement -

मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्ती साधली गेली पाहिजे – संतोष हजारे

नगर – सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करतांना सर्वसामान्यांना न्याय देण्याची भुमिका ठेवून काम झाले पाहिजे. त्यांच्या अडचणी, प्रश्न सोडविले गेले पाहिजे. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजाची उन्नत्ती साधली गेली पाहिजे. आजचे सत्कारमुर्ती अ‍ॅड.अभय आगरकर, प्रा.माणिकराव विधाते, राम पानमळकर हे राजकारणापेक्षा समाज कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

सामाजिक प्रश्नांची जाण असलेले हे व्यक्तीमत्व आज विविध संस्थांवर काम करत आहेत. नुकतीच त्यांची या पदांवर दुसर्‍यांदा निवड होत आहे, हीच त्यांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल. आताही मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाज संघटन त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांची उन्नत्ती साधतील, असा विश्वास फुले ब्रिगेडचे भिंगार अध्यक्ष संतोष हजारे यांनी केले.

भिंगार शहर फुले ब्रिगेडच्यावतीने भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.अभय आगरकर व राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा.माणिकराव विधाते तसेच माळी महासंघ सहकार आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी राम पानमळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष संतोष हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमित खामकर, किरण जावळे, महेश झोडगे, करण भळगट, अनुराग आगरकर, महेश नामदे, सोनू भुजबळ, संजय सपकाळ, अनिल क्षीरसागर, राहुल पानसरे, राकेश ताठे, अ‍ॅड.अक्षय भांड, राजु धाडगे, देवीदास हजारे, किरण गिलचे, सचिन जाधव, शिवम भंडारे, रामभाऊ पांढरे, हभप धाडगे महाराज, भुषण भुजबळ, मंगेश पठारे, सनी हजारे, शुभम भंडारी ,सुर्यकांत कटोरे, बप्पा घुले, मेजर बहिरट, सदा नागापुरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, आपण आपले काम प्रामाणिकपणे केले की माणसे आपोआप जोडली जातात. त्यातून अडचणी-प्रश्न समजात आणि ते सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न होत असतात. समाजोन्नत्तीसाठी आपण मिळालेल्या पदाचा उपयोग केला. जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा व समाजाचे प्रश्न योग्य पातळीवर पोहचवून ते सोडविले. यापुढील काळातही असेच कार्य पुढे सुरु राहील, असे सांगितले.

यावेळी प्रा.माणिकराव विधाते म्हणाले, समाजात काम करतांना प्रत्येकाला न्याय कसा देता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. समाजाने घेतलेल्या भुमिकेला पाठिंबा देऊन त्यासाठी एकत्रित प्रयत्न केल्यास प्रश्न नक्कीच सुटतात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नत्तीसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. सत्कारानिमित्त सर्व एकत्र आल्याने ही चांगली सुरुवातच झाली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी राम पानमळकर यांनीही फुले ब्रिगेडच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाजोन्नत्तीच्या कार्यात आम्ही सर्व योग्य ते योगदान देऊ असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित खामकर यांनी केले आभार सुर्यकांत कटोरे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles