आगडगावला भाविकांच्या हस्ते महाआरती
अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे
शहराजवळ असणाऱ्या आगडगाव येथील श्री काळ भैरवनाथांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर दुसऱ्या रविवारी दि २४ ऑक्टो.ला रविवारचा उत्सव साजरा करण्यात आला.दुपारी भाविक अनुजा कांबळे व सुवर्णा सोमवंशी यांच्या हस्ते नैवेद्याचे ताट वाद्याच्या गजरात मंदिरात नेण्यात आले.

यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे,महेश कांबळे,दीपक गुगळे,नितीन कराळे,गौरी बारवकर,नक्षत्रा कांबळे सह भाविक उपस्थित होते.
नंतर भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व अनुजा कांबळे व सुवर्णा सोमवंशी यांच्या हस्ते भाविकांना कोरडा महाप्रसाद, पुलाव व लापशी वाटण्यात आली.
काल दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून भाविकांना दर्शन सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले होते.सॅनिटायझरचा आवश्यक त्या सर्व ठिकाणी वापर, मास्कची सक्ती, सामाजिक अंतर, तापमान तपासणी, हात-पाय धुण्याची व्यवस्था आदी सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
देवस्थान नगर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असून, पर्यटकीय दृष्ट्या नगर शहरातील लोकांना जवळचे आहे.या ठिकाणी प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी अन् खमंग,आमटी,भात आणि शिरा हा भैरवनाथ देवस्थाना जवळील महाप्रसाद असतो.तो दिवाळी नंतर सुरु करण्यात येईल असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.सध्या कोरडा महाप्रसाद देण्यात येत आहे.