भोग्यांवर करवाई केली नाही तर पालकमंत्री यांच्या समोर मनसे हनुमान चालीसा लावणार.. नितीन भुतारे

0
95

अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदी वरील भोंगे खाली उतरवा अन्यथा त्याच्या दुप्पट आवाजात मनसेचे कार्यकर्ते स्पीकर वर हनुमान चालीसा लावणार.असा इशारा राज्य सरकार ला दिला.त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटवायला सुरवात झाली आहे.

मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे थेट ईशारा दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोग्यांवर करवाई करा,अन्यथा मनसे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीसमोर हनुमान चालीसा लावणार असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे.त्यामुळे येणारा पालकमंत्र्यांचा दौरा हा वादाचा विषय ठरणार आहे.

मनसे,सरकार मधील मंत्र्यांना घेरण्याचा तयारीत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यावर करवाई करण्याच्या अधिकार हा सरकारला असुन पालकमंत्री या नात्याने आपण जिल्हा प्रशासनाना तसे आदेश द्यावेत. अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी पालकमंत्र्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.त्यामुळें पोलीस प्रशासनाला यामुळे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे.

सरकार राज्यभर मनसेने लावलेल्या हनुमान चालीसेवर कारवाई करत आहे.त्यामुळे न्याय हा सर्वांना सारखा असावा मशिदींवरील भोंग्यावर सरकारने करवाई करणे गरजेचे आहे.असे या वेळी मनसेचे नितीन भुतारे म्हणाले.
येणारा पालकमंत्र्यांचा दौरा हा हनुमान चालीसामुळे गाजणार आहे. मनसे रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांना आव्हान देणार असल्याचे यावेळी नितीन भुतारे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here