कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

चांदीच्या बिस्किटाचे मानकरी कर्जत येथील संदीप नरहरी कोपनर ते ठरले. तसेच यावेळी अकरा विजेत्यांना चांदीचे क्रमांक दोन चे बिस्किट व ५१ विजेत्यांना चांदीचे लहान आकाराचे बिस्किट देण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे यावेळी बोलताना म्हणाले की, मी अनेक ठिकाणी विविध व्यवसायिक पाहिले परंतु कर्जत येथील शौर्यविर ग्रुप ऑफ बिझनेस या उद्योग समूहाचे प्रमुख शरद तनपुरे यांनी चॉप्सकट च्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या ग्राहकांसाठी सोने व चांदीचे बिस्किटे सोडतीच्या माध्यमातून वाटप केली आहेत हा एक अनोखा उपक्रम राबवण्याचे मी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही आणि ऐकले देखील नाही.
या युवकाने अशा पद्धतीने चिकन, मटण ,मासे, यांचे आद्यवत दालन कर्जत सह राज्यातील सतरा ठिकाणी सुरू केली आहेत आणि हे सर्व करताना व्यवसायामध्ये देखील आपण काय करू शकतो याचा एक आदर्श संपूर्ण जगभरामध्ये निर्माण केला आहे.आगामी काळामध्ये या उद्योग समूहाच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र अशा पद्धतीने ते अत्याधुनिक पद्धतीचे कारण सर्वत्र सुरू करणार आहे त्यांच्या या उपक्रमाला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, तालुक्यातील वडगाव तनपुरे या छोट्याशा गावांमधून शरद तनपुरे या युवकाने नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभा राहात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.एक वर्षापूर्वी कर्जत मधून त्यांनी चॉप्सकट या नावाने मटण चिकन मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायाची परंपरा असलेली विक्रीची पद्धत त्यांनी पूर्णपणे बदलली. अत्याधुनिक दालन स्वच्छता टापटीप आणि ग्राहकांना सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे या व्यवसायाला एक वेगळा आयाम त्यांनी देताना राज्यात १७ ठिकाणी याच्या ब्रांचेस त्यांनी सुरू केले आहेत.
मातृ शाखा असणाऱ्या कर्जत येथे प्रथम वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत त्यांच्या सर्व ग्राहकांना सोने व चांदीची बक्षिसे देऊन लयलूट केली आहे.यामुळे ग्राहक देखील त्यांच्यावर आता चांगलीच खूश झाले आहेत.
देश सेवा करणाऱ्या जवान व अपंगांसाठी विशेष ऑफर
यावेळी बोलताना उद्योजक शरद तनपुरे म्हणाले की आज या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझ्या राज्या मध्ये ज्या सतरा शाखा आहेत त्या सर्व ठिकाणी देशसेवा करणारे जवान यांच्या कुटुंबियांसाठी व तसेच सर्व अपंगांसाठी त्यांनी खरेदी केलेल्या मटन मासे चिकन यावर त्यांना दहा टक्के रोख सूट देण्यात येणार आहे.
अशा पद्धतीने त्यांनी रोज जरी खरेदी केली तरी त्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी ही सवलत कायम सुरू ठेवणार आहे आणि हा माझा संकल्प आहे असे शरद तनपुरे यांनी जाहीर करतात सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मध्ये त्यांचे स्वागत केले.
यावेळी सचिन घुले भाऊसाहेब मनमाड व गणेश जेवरे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन पत्रकार दादा शिंदे यांनी केले.