श्राध्दविधी मुळे पुण्यकर्माचा संचय होतो – हरिभाऊ डोळसे
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात,असा समज आहे.श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण.पुर्वजांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्ध विधि करणे आवश्यक आहे.
म्हणून विश्व हिंदू परिषद मंदिर,मठमंदिर समितीतर्फे हिंदू समाज बांधवांसाठी सामुदायिक श्राद्धविधी चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पुढील वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या या श्राद्धविधी विधीमुळे पुण्यकर्माचा संचय होतो.असे प्रतिपादन मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे यांनी केले.
लालटाकी येथील खाकीदास बाबा मठ येथे विश्वहिंदु परिषद,मठ मंदिर समिती तर्फे विनामुल्य सामुदायिक श्राध्द (तर्पण)चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाचे पौराहित्य सचिन पाठक गुरुजी यांनी केले.
कार्यक्रमासाठी मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, डॉ.चंद्रकांत केवळ,अॅड.श्रीकांत मांढरे,गणेश हजारे,सचिन म्हस्के,देविदास साळुंके,श्रीराम हजारे,निरंजन घोडके,उमेश काळे,हेमंत आयचित्ते आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी खाकीदास बाबा मठ(ट्रस्ट) चे अध्यक्ष मनोज मुंदडा,विश्वस्त चंद्रकांत काबरा यांचे विशेष सहकार्य लाभले.