अहमदनगर प्रतिनिधी – मौजे मढी (ता.पाथर्डी) येथे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात आजी-माजी विश्वस्तांच्या वादानंतर दाखल झालेल्या अॅट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.
आजी-माजी विश्वस्तांच्या वादानंतर दि.१६ ऑगस्ट २०१८ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनला अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्ह्याच्या सखोल तपासीअंती पोलिसांनी सुधीर भाऊराव मरकड,देविदास विनायक मरकड, आणि अण्णासाहेब देवराम मरकड यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर विशेष खटल्याची सुनावणी अहमदनगर येथील विशेष न्यायालयात झाली.सर्व आरोपींच्या वतीने अॅड.परिमल कि.फळे यांनी बाजू मांडली.तपासातील त्रुटी आणि अॅड.परिमल फळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश ए.एम.शेटे यांनी आरोपींची अंतिम सुनावणीनंतर निर्दोष मुक्तता केली.
सदर विशेष खटल्या कामी अॅड.परिमल फळे यांना अॅड.बाजीराव बोठे,अॅड.सागर गायकवाड, अॅड.अभिनव पालवे आणि अॅड. प्राजक्ता आचार्य यांनी सहाय्य केले.