मणिपूरला आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड व बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध.
अहमदनगर (प्रतिनिधी)- मनिपुर येथे ४ मे २०२३ रोजी देशाला लाजवेल अशी घटना घडली असून आदिवासी तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत सदर घटनेची जबाबदारी म्हणून मणिपूर भाजपचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा देण्याचे मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे समवेत शरद खरात, संतोष गलांडे, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, विजय नाना साळवे, योगेश साठे, आप्पासाहेब मकासरे, गौतम पगारे, अमोल काळकुंड, प्रवीण ओरे, ज्योती गायकवाड, मनीषा साळवे, अमर निर्भवणे, मारुती पाटोळे, डॉ.जालिंदर लिंगे आदीसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. सदरच्या घटनेचा देशभर निषेध करण्यात येत असून या जमावाकडे AK47, एस एल आर सारखे अत्याधुनिक हत्यारे असल्याचे पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. परंतु अद्यापही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
गेल्या ८० ते ९० दिवसात २०० हून अधिक बळी गेले आहेत राज्यातील नाग आणि कुकी समाजातील अत्यंत परिस्थिती भयभीत झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शासन या घटनेवर बोलण्यास तयार नसून त्यामुळे मणिपूर येथील मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्री यांनी लवकरात लवकर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.