मतदार यादीतून इच्छुक उमेदवारांसह अनेकांची नावे गायब

0
105

औरंगाबाद खंडपीठामध्ये व जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागणार – राम शिंदे

 

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत नगरपंचायत मधील सतरा प्रभागातील जी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये इच्छुक उमेदवारांसह अनेकांचे नावे गायब करण्यात आली आहेत.या विरोधात औरंगाबाद खंडपीठ मध्ये व जनतेच्या न्यायालयामध्ये आपण दाद मागणार आहोत. अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी पक्ष निरीक्षक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, संघटन सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे,शहर थँक्यू अध्यक्ष वैभव शहा.गणेश पालवे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार यांच्या वर टीका

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की,आज कर्जत नगरपंचायत साठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.एकुण सतरा प्रभागातील ६३  इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कर्जत शहरासाठी राज्याच्या तिजोरीतून १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करू दिला आणि गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मनापासून प्रमाणिक प्रयत्न केला.या उलट गेल्या दोन वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोटया स्वप्नामुळे जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन वर्षांत त्यांना कर्जत शहरासाठी कुठलेही भरीव काम करता आले नाही.

त्यामुळे गेल्या सहा महिन्या पासून ते रडीचा डाव खेळत आहेत हे कर्जतच्या जनतेला कळले आहे.राजकीय इर्षेला पेटुन सुडाच्या, कुटील दबावाच्या,राजकारणातून  त्रासदायक चित्र निर्माण केले, हे सर्व जनतेने पाहिलेच आहे.परंतु एवढे होऊनही विजयाची खात्री नसल्याकारणाने व पराभव समोर दिसत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वार्ड नुसार मतदार याद्यात छेडछाड करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियम धाब्यावर बसवले आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यां कडुन घेण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील हरकती कडे व आक्षेपांकडे डोळे झाक करत, लोकशाहीला काळीमा फासण्याचे कृत्ये केले आहे.कुठल्याही प्रकारचा आक्षेप नसताना भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदासाठी इच्छुकांची नावे अंतिम मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत.त्याच बरोबर पक्ष विचाराला मानणाऱ्या अनेक मतदारांना इतरत्र  प्रभागात स्थलांतरित करण्यात आले आहे.

दबावाच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी शहराच्या शेजारील खेडे गावांमधील लोकांचा शहरातील प्रभागात समावेश करण्यात आला आहे.एकुण घटनाक्रम पाहता सामान्य मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावण्याचे कारस्थान केले जाते आहे.या विरोधात भारतीय जनता पार्टी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे असे राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

जनतेमध्ये भाजपला निवडून देण्याची विचारधारा लक्षात आल्यामुळे त्याचा  धसका आमदार रोहित पवार यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. म्हणून राजकीय दबावाने ,शासकीय अधिकाऱ्यां मार्फत  मतदार यादीत छेडछाड करणे व  शहरालगतच्या खेडेगावातील मतदारांचा दहशती साठी समावेश करणे म्हणजे या गोष्टी मधुन शहरातील सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क हिरावण्याचे पाप केले आहे, तसेच अधिकारी देखील काम करताना कोणाच्या सांगण्यावरून काम न करता त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये काम करणे योग्य राहील कारण सरकार हे कोणतीच कायमस्वरूपी नसते हे त्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे.अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here