मताच्या फायद्यासाठी नामांतराचा मुद्दा करणाऱ्या उमेदवाराला जागा दाखवून देणार- अजीम राजे.
अहमदनगरच्या नामांतराचा कोणताही शासकीय निर्णय अध्यापि झालेला नाही.
अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार.
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे म्हणाले की, अहमदनगर शहराला ५०० हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. हा शहर ऐतिहासिक शहर असून हे शहर कोणाची जहागिरी व बक्षीस बहाल केलेला शहर नसून हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे. परंतु काही माते फिरू आपला हित जोपासण्यासाठी व राजकीय षडयंत्र करण्यासाठी नामांतराचा मुद्दा घेतलेला आहे.
अहिल्याबाई होळकर यांना कुठल्याही समाजाचा विरोध नसून अहिल्याबाई होळकर यांनी जेथे आपले पराक्रम गाजविले तेथे नामांतर होण्याची गरज आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्या प्रचारात बॅनर, पॉम्प्लेट, सोशल मीडिया तसेच अनेक ठिकाणी सभेच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी व मतांच्या फायद्यासाठी उमेदवार अहमदनगर शहर ऐवजी अहिल्यानगर करत आहे. व दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याची भावना निर्माण करत आहे.
त्यामुळे नामांतराचा कुठलाही निर्णय झालेला नसून हे राजकीय षडयंत्र स्वयंघोषित प्रमाणे नामकरण करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर लावणार असाल तर नागरीकांना विचार करावा लागेल व अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार. असल्याचे समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे म्हटले आहे.
- Advertisement -