मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा नगर जिल्ह्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नगर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेकांना मोठा लाभ झाला आहे. दुर्धर व मोठ्या आजारांवर मोफत उपचार झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून धन्यवाद देण्यात येत आहेत. नगर जिल्ह्यातही या योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना लाभ झाला. स्थानिक पदाधिकार्‍यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे ही सेवा गरजू रुग्णांपर्यंत पोहचली आहे. आज नगर जिल्ह्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर त्यांनी पदाधिकार्‍यांचे कौतुक  केल्याने जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन मिळणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित परदेशी यांनी केले.

नगर जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नगर जिल्ह्यातील कामाचा अहवाल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना जिल्हा संपर्कप्रमुख रणजित परदेशी यांनी सादर केला. याप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे राज्य प्रमुख रामहरी राऊत उपस्थित होते. यावेळी समन्वयक संदिप सप्रे, उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, शहरप्रमुख रोहित लोखंडे आदि उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नगर जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचे चांगले काम असून,  पदाधिकार्‍यांनी यापुढेही असेच करुन सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम करावे, आपणास सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल. यापुढेही गरजू रुग्णांना कसा लाभ होईल, यासाठी प्रयत्न करावेत. नगरचा अहवाल हा राज्यासाठी दिशादर्शक असाच असल्याचे सांगितले.

यावेळी मंगेश चिवटे म्हणाले, नगरमधील रुग्णांना मदत कक्षाच्या माध्यमातून चांगली सेवा उपलब्ध व्हावी, त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. नगरमधील पदाधिकारी अ‍ॅक्टीव्ह असल्याने अनेक रुग्णांना चांगला लाभ झाला आहे. आज सादर झालेला अहवाल सकारात्मक असून, यापुढेही असेच कार्य करत रहावे, असे मार्गदर्शन केले.

यावेळी मंगेश शिंदे, अविनाश व्यवहारे, दिनेश सैंदर, महेश तोडमल, योगेश गोंधळे, तारिक कुरेशी, अभिनंदन कुरमुडे, ओंकार फुलसौंदर विनायक बारटक्के, सुभाष काकडे, किरण जव्हेरी, गिरिष सोनी, विकी गारदे, सागर फुलसौंदर, सुरेश नागापुरे, स्वप्नील भावसार, प्रसाद पादीर, अक्षय वाघमारे, प्रविण पवार, महेश सातपुते आदिंसह नगर जिल्ह्यातील सुमारे 450 पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!