संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचे मंत्र अंगी बाळगावे – उपमहापौर गणेश भोसले
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर महानगर पालिकेने महिन्यातून दोनदा शहर स्वच्छ अभियान सुरू करण्यात आले आहे.या माध्यमातून शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे आपले शहर स्वच्छ सूंदर करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होणार आहे,स्वच्छतेमुळे साथीच्या आजारांच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.संत गाडगेबाबा यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले आहे.आज ही आपण स्वच्छतेवर काम करत आहोत. संत गाडगेबाबा यांचा आदर्श बाळगून स्वच्छतेचे महत्व शहराला पटवून देऊ,केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेवर काम करत आहे त्याच धर्तीवर अहमदनगर महानगरपालिकेचनेही शहरात स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केले असल्याचे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी स्थायी समितीचे सभापती मा.सचिन जाधव,नगरसेविका नगरसेविका शैलाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे,दिनेश सिनारे,वैभव जोशी,मेहर लहारे,शंकर शेडाळे, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.