मनपात प्रशासक राज लोकांना होतो मनस्ताप मॉर्डन कॉलनीत रस्त्यांची दुरवस्था
नगर- महानगर पालिके वर सद्या प्रशासक राज आहे नगरसेवकांची मुदत संपली तसा प्रभागाचा विकास थांबला आयुक्तसाहेब तुम्ही तरी नागरिकाच्या प्रश्नात लक्ष द्या अशी मागणी मॉर्डन कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी केली आहे. सावेडी उपनगरांतील गुलमोहर रोडवरील मॉर्डन कॉलनीत ड्रेनेज चे काम सुरू केले काही ठिकाणी पाईप टाकून झाले तर ऐन रस्ता वळणाला मोठा खड्डा करून पाईप लाईन केली पण व्यवस्थित बुजवली नाही तर काही ठिकाणी अजून पाईप टाकून काम बाकी आहे पावसामुळे सर्वत्र चिखल झाला पायी चालणे अवघड होऊन बसले टू व्हीलर तर स्लीप होते अशा परिस्थितीत नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कडे जाणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल हे विचारायला नको मनपा आयुक्तांनी याबाबत गंभीर पणे दखल घेवून ठेकेदाराला रस्ते पूर्वी प्रमाणे करण्याची समज द्यावी. तातडीने अर्धवट कामे पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.