अनधिकृत गाळे पाडणे होत नसेल तर आत्मधनाची परवानगी द्या – सामाजिक कार्यकर्ते निसार बाटलीवाले
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
आपू हती चौक लाल टाकी येथील मुस्लिम मिजगर जमात ट्रस्ट यांचे सर्वे नंबर 6998 वरील जागेमध्ये अनधिकृत बांधकाम व हस्तांतर प्रक्रिया थांबून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त पठारे यांच्याशी चर्चा करताना हाजी निसारभाई बाटलीवाले, आतिक तांबटकर, हाजी आकील खान, आताभाई चांदवडी, हाजी आसिफ काझी आदी उपस्थित होते.
नागोरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्ट अहमदनगर च्या संस्थेची लाल टाकी येथे सर्वे नंबर 119 सिटी सर्वे 6998 ही जागा न्यासाच्या मालकीची असून धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगर यांचा 11 जानेवारी 2019 रोजी च्या आदेशान्वये 25 जून 2021 रोजीच्या पत्रान्वये सदर न्यायसावर कोणतीही कायदेशीर विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही त्यामुळे काही स्वयंघोषित विश्वस्तांनी सदर जागेवर कब्जा करून त्यावर अनधिकृतपणे गाळ्यांचे बांधकाम करून सदर गाळ्यांच्या बदल्यात समाजाच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी स्वीकारून परस्पर विल्हेवाट लावली आहे.
मनपा आयुक्त यांनी आदेश देऊन देखील झोनल अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही.अशा परिस्थितीत उपरोक्त बेकायदेशीर स्वयंघोषित विश्वस्तांनी समाजाची दिशाभूल करून त्याचे बांधकाम करून सदरचे गाळ्यांचे हस्तांतरण प्रक्रिया करत आहे तरी उपरोक्त व्यक्ती विरुद्ध विनापरवानगी जागेवर गाळ्यांचे बांधकाम करून गाळे हस्तांतर करण्याकरिता आर्थिक रक्कम स्वीकारला बाबत तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर दहाव्या दिवशी आयुक्तांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा बाटलीवाले यांनी दिला आहे.