अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 112 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन संपन्न
मनपा कर्मचारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग अ प्राप्त – चेअरमन किशोर कानडे
नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला 112 वर्षाची परंपरा असून संचालक मंडळाने सभासदाच्या हिताचा चांगला कारभार केला असून अडीअडचणी वर मात करीत पतसंस्था स्व- भांडवली केले आहे. सभासदाच्या जोरावर पतसंस्थेची प्रगती होत असून यावर्षी सभासदांना 12 टक्के प्रमाणे डीव्हीडंट वाटप करण्यात येणार आहे. सभासदांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व लग्न समारंभासाठी तातडीने कर्ज रूपी आर्थिक मदत केली जाते याचबरोबर आरोग्याच्या उपचारासाठी 25 हजाराची मोफत मदत दिली जाते सभासदाच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. याच बरोबर मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो. मनपा कर्मचारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात चांगला कारभार केला असल्यामुळे ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला असल्याची माहिती चेअरमन किशोर कानडे यांनी दिली.
अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 112 वा वार्षिक अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी चेअरमन किशोर कानडे, व्हा.चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर,संचालिका प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी ,अकाउंट संतोष गवळी आदी उपस्थित होते.
व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २ जून रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच 112 वा वार्षिक अहवाल सभासदांच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आला आहे. तरी सर्वांनी त्याचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्या सर्वांना आपली पतसंस्था यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास मदत होईल. यासाठी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.