सभासदांच्या मुला-मुलींचा शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आरोग्यसाठी पतसंस्था पाठीशी खंबीरपणे उभी : बाळासाहेब पवार
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
मनपा पतसंस्थेच्या सभासदांच्या जोरावर अहमदनगर मनपा सहकारी पतसंस्था स्वभांडवली झाली आहे. त्यामुळे सभासदांना १६ टक्के व्याज दारावरून कर्ज वाटप १३ टक्के व्याजदरावर आले मुळे सभासदांचे आर्थिक हित जोपासण्याचे काम पंतसंस्थेने केले आहे. सभासदांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व कुटुंबाच्या आरोग्यसाठी नेहमीच कर्ज रुपी आर्थिक मदत ताबडतोब करण्याचे काम केले जात आहे.
याच बरोबर मुला-मुलींच्या विवाह कार्यासाठी पतसंस्था सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. सभासदांच्या दहावी व बारावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करून पाठीवर शाब्बासकीची थाप देण्याचे काम पतसंस्थेने केले असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब पवार यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थाच्या सभासदांच्या दहावी-बारावी वर्गातील गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक किशोर कानडे हे होते.
चेअरमन बाळासाहेब पवार, व्हाईस चेअरमन विकास गीते, संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर,सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर,अजय कांबळे प्रकाश अजबे, कैलास भोसले, संचालिका नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे, व्यवस्थापक आनंद तिवारी, सभासद प्रमिला पवार, बलराज गायकवाड, कैलास चावरे, गुलाब गाडे, आदी उपस्थित होते.
संचालक बाबासाहेब मुदगल म्हणाले की गेल्या चार वर्षांमध्ये मनपा पंतसंस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्यात आले. सभासदांच्या सहकार्यामुळेच पतसंस्थेची वाटचाल यशाच्या शिखराकडे सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांना विश्वासात घेऊन पतसंस्थेचा कारभार सुरू आहे असे ते म्हणाले