मनपा राबवणार वृक्ष दत्तक योजना – उपयुक्त विजयकुमार मुंडे

- Advertisement -

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंद सोसायटी येथे वृक्षारोपण

मनपा राबवणार वृक्ष दत्तक योजना – उपयुक्त विजयकुमार मुंडे

नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाचे काम केले जात असून नागरिकांनी देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची खरी गरज आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष दत्तक योजना राबविणार असून नागरिकांना दोन झाडे दिली जाणार असून या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनही लोक चळवळ निर्माण होईल तरी नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले.
अहमदनगर  महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आनंद सोसायटी येथे वृक्षारोपण करताना उपायुक्त विजयकुमार मुंडे समवेत प्रशांत खांडकेकर,शशिकांत नजान,सुरेश खामकर,तुलसीराम पालिवाल, आनंदनगर सोसायटीचे जितेंद्र भळगट, उदय खिलारी, सागर अष्टेकर आदी उपस्थित होते

चौकट :  स्वच्छ सुंदर हरित नगर करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपयोजना राबवल्या जात आहे तरी नागरिकांनी पावसाळ्यामध्ये आपापल्या परिसरामध्ये दोन झाडे लावून पर्यावरण संतुलनासाठी काम करावे असे आवाहन उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन यांनी केले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!