मनसेच्या नगर शहर उपाध्यक्षपदी किरण रोकडे
नगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगर शहर उपाध्यक्षपदी किरण प्रशांत रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. प्रशांत रोकडे यांना शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी नियुक्ती पत्र दिले.
याप्रसंगी गजेंद्र राशिनकर म्हणाले, प्रशांत रोकडे हे मनसेचे कार्य चांगले पद्धतीने करत असून, पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम वेळोवेळी विविध क्षेत्रात निष्ठेने राबवत आहेत. विविध उपक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांची कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते या पदाला न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला.
नियुक्तीनंतर किरण प्रशांत रोकडे म्हणाले, या आधी विभाग अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम माझ्याकडून झाले. याची वरिष्ठांकडून दखल घेऊन आज माझी शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून मला माझ्या कामाची पोच पावती मिळाली आहे. यापुढे अधिक जोमाने काम करून पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माझ्याकडून केले जाईल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम निष्ठापुर्वक करु, असे सांगितले.
किरण रोकडे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.