मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती
राज ठाकरे यांनी मराठी माणसांना त्यांचे हक्क मिळवून दिले – सचिन डफळ
नगर – महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थीचे प्रश्न, युवकांना रोजगार, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध घटकांच्या उन्नत्तीसाठी मनसेचे पदाधिकारी काम करत आहेत. विविध आंदोलनांच्या माध्यमातून अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णायास विरोध करुन मराठी माणसांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक मनसैनिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच कार्यरत आहेत. मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घाष्यु मिळावे, अशी श्री विशाल गणेश चरणी प्रार्थना केली असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर येथे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, इंजि.विनोद काकडे, दिपक दांगट, वाहतुक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, विजय मोरे, गणेश बेरड, आदिनाथ पुंड, प्रमोद ठाकूर, प्रमोद जाधव आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन हिरवे म्हणाले, युवकांना खर्या अर्थांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिशा देण्याचे काम केले आहे. आपल्या हक्कासाठी लढा देण्याची त्यांची भुमिका ही सर्वांनाच भावते. अनेक मुद्दांवर त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारलाही झुकावे लागले आहे. हिंदूत्व आणि मराठीच्या मुद्यांवर महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांचा वाढदिवस हा मनसैनिकांसाठी उत्साहवर्धक असल्याचे सांगितले.