जिल्हा रुग्णालयातील लागलेल्या आगी संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मनपा आरोग्य समितीचे डॉ.सागर बोरुडे यांची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – नुकतेच जिल्हा रुग्णालय मध्ये जे जळीतकांड घडले यामध्ये फायर ऑडिट झाले नाही त्यामुळे आज ही घटना घडली आहे.यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी केली आहे.
डॉ.सागर बोरुडे पुढे म्हणाले की,महापालिकेमध्ये वारंवार नगर शहरातील इमारतींचे फायर ऑडिट करण्याच्या वारंवार सूचना दिल्या होत्या परंतु प्रशासन निष्काळजीपणा दाखवला आहे.त्यामुळे अशा मोठ्या आगीच्या घटना नगर शहरामध्ये घडत आहे.
जिल्हा रुग्णालयाची ही नवीन इमारत होती या इमारतीचे फायर ऑडिट झाले नव्हते जर फायर ऑडिट झाले असते तर ही घटना घडली नसती तरी यापुढील काळात जिल्हा प्रशासनाच्यावतीने कायद्याची कडक अंमलबजावणी करावी तसेच या घटनेमध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मयत कुटुंबीयांच्या वारसांना पंधरा लाखाची आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी डॉ.बोरुडे यांनी केली आहे.