मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापन दिन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी –

1990 सालापासुन मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी सामाजिक चळवळ आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचाराने वाढत असलेली वैचारिक चळवळ आहे. या संघटनेच्या माध्यमून स्त्री शक्तीला श्रद्धा स्थान मानून स्त्रीयांचा सन्मान करण्याची शिकवण देऊन लाखो लोकांना एकत्र आणले आहे. बहुजन समाजाने विशेषतः युवकांनी राजकीय संघर्षात न पडता आपला व्यवसाय, शेती यावर लक्ष  केंद्रित करुन प्रगती करावी हे पटवून दिले. नगरमध्येही संघटनेच्यावतीने समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठा आरक्षण लढ्यामध्ये संघाचे कार्यकर्ते सक्रिय सहभाग देत आहेत. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या पायावर उभे करणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन, त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणेे, त्याचबरोबर शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रश्न आदि कार्यात सेवा संघ पुढाकार घेत आहेत. समाज संघटनेचे हे कार्य यापुढेही असेच सुरु राहिल, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी केले.

     मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, इंजि.मनोज पारखे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी किरण आव्हाड, बी.बी.सिनारे, गौतम देवळालीकर, मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक उदय अनभुले, अमोल लहारे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, गणेश घिगे, अशोक वारकड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बी.बी.सिनारे म्हणाले, समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा देणार्‍या राष्ट्रपुरुषांची साखळी समजावून सांगण्याचे काम सेवा संघाचे कार्यकर्ते करत आहेत. आज मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे. आज या चळवळीमुळे अनेक युवक वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार राहिलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी  इंजि.मनोज पारखे, सतीश इंगळे आदिंनी मराठा सेवा संघाच्या जिल्ह्यातील कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वारकड यांनी केले तर आभार उदय अनभुले यांनी मानले. कार्यक्रमास बबन सुपेकर, रणजित रक्ताटे, प्रशांत बोरुडे, किशोर कराळे, प्रितेश बोरुडे, सुर्यकांत कडू, महादेव कोतकर, केशव हराळ, अशोक कराळे  आदि उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!