मल्हार सेनेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी आसाराम कर्डिले यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी) – मल्हार सेनेच्या वतीने नवनिर्वाचित दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी आसाराम कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी धनगर समाजासाठी केलेले कार्य व धनगर समाजाचे सोडवलेले प्रश्न या सगळ्या बाबींची दखल घेऊन व समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने आसाराम कर्डिले यांची निवड मल्हार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लहू शेवाळे यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली यावेळी शेवगावचे उपसभापती गणेश खबरे, राजु शिंदे, दत्तात्रेय वीर, अरुण कर्डिले, राजू वीर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नूतन दक्षिण जिल्हा अध्यक्ष आसाराम कर्डिले म्हणाले की, धनगर समाजातील मेंढपाळांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार, महिलांचे विद्यार्थ्यांचे व इतर सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून जिथे जिथे धनगर समाजावर अन्याय अत्याचार होईल तेथे आवाज उठविला जाणार असून धनगर समाजातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी नोकरी मेळाव्याचे देखील आयोजन करणार असल्याचे सांगितले.