महात्मा गांधीजी जयंती निमित्त पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन मतदार जागृती

- Advertisement -

सार्वजनिक स्वच्छतेने निरोगी जीवन जगता येणार – ह.भ.प.अ‍ॅड.सुनिल तोडकर

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची व मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सदृढ करण्याची उपस्थितांना शपथ

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य, नेहरु युवा केंद्राच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त अभियानातंर्गत पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत मतदानाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पाळन करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रारंभी वाडियापार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास नर्मदा फाऊंडेशनचे ह.भ.प. अ‍ॅड. सुनिल तोडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जय असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, नेहरु युवा केंद्राचे रमेश गाडगे, उत्कर्ष संस्थेच्या नयना बनकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, सुभाष जेजुरकर, भारती शिंदे, शरद वाघमारे, रजनी ताठे, पोपट बनकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेची व मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सदृढ करण्याची शपथ देण्यात आली. रघुपती राघव राजाराम… पतीत पावन सिताराम… गीत सादर करीत कार्यक्रमस्थळी चक्क दादा कोंडके अवतरले. दादा कोंडके व त्यांच्यासह उपस्थित कलाकारांनी निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचे तर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व सांगितले.

तसेच विनामास्क कार्यक्रमस्थळी हजर असलेल्यांना कोरोना नियम पालण्याचा पथनाट्यातून संदेश दिला. या पथनाट्यात ज्युनिअर दादा कोंडके फेम अनिल पाटोळे, रसिक रंजनचे डॉ. धीरज ससाणे, आरती शिंदे, अमन भालेराव सहभागी झाले होते.

ह.भ.प. अ‍ॅड.सुनिल तोडकर म्हणाले की, आंतरिक व बाह्य स्वच्छता निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, आपला घर, परिसर, सार्वजनिक स्वच्छतेने निरोगी जीवन जगता येणार आहे. स्वच्छता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनण्याची गरज असल्याचे सांगितले.

अ‍ॅड. महेश शिंदे यांनी मतदान प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सुदृढ लोकशाहीसाठी निर्भयपणे व अमिषाला बळी न पडता शंभर टक्के मतदान झाले पाहिजे.तरच योग्य लोकप्रतिनिधी नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!